Sharad Gore 
मनोरंजन

Sharad Gore : जागतिक पडद्यावर मराठीचा झेंडा! ‘सूर्या एक प्रेरणादायी प्रवास’चा आंतरराष्ट्रीय महोत्सवात दणदणीत गाजावाजा

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी! सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक शरद गोरे Sharad Gore यांच्या सूर्य एक प्रेरणादायी प्रवास Surya Ek Preranadayi Pravas या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे.

Published by : Riddhi Vanne

मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बातमी! सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक शरद गोरे Sharad Gore यांच्या सूर्य एक प्रेरणादायी प्रवास Surya Ek Preranadayi Pravas या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलाच्या संघर्षाची कहाणी मांडतो. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत तो तरुण आयएएस अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण करतो, याचे प्रेरणादायी चित्रण या कथेत आहे.

या चित्रपटाला (World Film Festival Cannes) जागतिक चित्रपट महोत्सव कान्स, (Berlin International Film Festival) आणि (Golden Lion International Film Festival) बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि गोल्डन लायन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांसारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शक आणि अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. तसेच (Tagore International Film Festival) टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह इतर अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही मानाचे सन्मान पटकावले.

चित्रपटात (Nitin Ratilal Patil) नितीन रतिलाल पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली असून (Neel Patil) नील पाटील बालकलाकाराच्या भूमिकेत झळकले आहेत. नायिकेच्या भूमिकेत (Prachi Suryavanshi) प्राची सूर्यवंशी दिसतात, तर स्वतः शरद गोरे यांनी प्रभावी खलनायक साकारला आहे. संगीत आणि कथानकामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला आहे. ग्रामीण वास्तव, जिद्द आणि यशाची प्रेरणा देणारा हा चित्रपट महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा