Sushant & Shahrukh Team Lokshahi
मनोरंजन

Sushant Rajput : पार्टीसाठी शाहरुखने जेव्हा सुशांतला दिले आमंत्रण...

सुशांतने यासंदर्भात एका मुलाखतीत खुलासा केला होता...

Published by : prashantpawar1

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant singh Rajput) याला जगाचा निरोप घेऊन बराच काळ लोटला. सुशांतच्या निधनाला दोन वर्षे झाली आहेत. तरी देखील सुशांतचे चाहते त्याची खूप आठवण काढतात. सुशांतचे जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवताच सुशांतने आपल्या अभिनयाची जादू चालवली होती. त्याचे चित्रपट आणि त्याचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडायचा. सुशांतने एकदा शाहरुख खानसोबत पार्टी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला शाहरुखसोबत मन्नत येथे पार्टी करायची होती. त्याने स्वतःलाही हे वचन दिले होते आणि एक दिवस त्याची ही इच्छा पूर्ण झाली. सुशांतने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं.

2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सुशांतने सांगितले होते की माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मी यशराजचे खूप चित्रपट पाहायचो. विशेषतः शाहरुख खान (Shahrukh Khan) . मी त्यांच्या चित्रपटांचा खूप मोठा चाहता होतो. मला आठवते की एकदा मी माझ्या मित्रांसोबत शाहरुख खानच्या घराजवळच्या कॉफी शॉपमध्ये बसलो होतो. त्यांच्या घरी पार्टी होती आणि मला त्यांच्या बंगल्याकडे जाणारी मोठी वाहने दिसत होती. मी त्या दिवशी स्वतःला सांगितले की मी एक दिवस या घरात जाईन आणि शाहरुखसोबत पार्टी करेन.

सुशांत पुढे म्हणाला की सुदैवाने त्या वर्षी शाहरुखच्या घरी ईद पार्टी होती आणि मला तिथं आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी मी खूप आनंदी होतो. सुशांतने शाहरुख खानसोबत स्टेजही शेअर केला आहे. एका अवॉर्ड फंक्शनमध्ये शाहरुखने सुशांतसोबत मस्ती केली ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) अजूनही व्हायरल होतो आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात