Sushmita Sen  Team Lokshahi
मनोरंजन

Sushmita Sen : ट्रोलर्सच्या ट्रोलिंगला सुष्मीताने दिलं प्रतिउत्तर...

सुष्मिता सेनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे.

Published by : prashantpawar1

नुकतच बॉलिवूडची सुपरस्टार सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि प्रसिद्ध उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) यांच्या लग्नाच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडवली. यानंतर सुष्मिता सेनला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. दरम्यान सुष्मिता सेनने स्वत:ला गोल्ड डिगर म्हणवून घेणाऱ्या पोस्टच्या माध्यमातून ट्रोलरवर आपला राग काढला आहे. उल्लेखनीय आहे की सुष्मिता सेनचे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कारण तिने ललित मोदींना तिच्या संपत्तीमुळे डेट केले आहे. यावर सुष्मिता सेनने आता तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करत एक लांबलचक नोट लिहिली आहे.

या चिठ्ठीत सुष्मिताने लिहिले की पूर्वी मला श्रीमंतीची लोभी अस संबोधून माझं नाव सोशल मीडियावर खूप फेकलं जात होतं. सध्या माझ्यावर जोरदार टीका होत असून मला या टीकाकारांची अजिबात पर्वा नाही. अशा स्थितीत काही बुद्धीजीवींच्या माध्यमातून मला वेगळं नाव देण्यात येत आहे. यामध्ये त्यांची खालची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. या क्षुल्लक लोकांव्यतिरिक्त मला माझ्या हितचिंतकांचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण मी सूर्यासारखी आहे जी त्याच्या अस्तित्वासाठी आणि विवेकासाठी सदैव चमकेल.

खरं तर काही दिवसांपूर्वी माजी आयपीएल कमिशनर ललित मोदी यांनी सोशल मीडियावर स्वतःचे आणि सुष्मिता सेनचे काही फोटो शेअर करत ते एकमेकांना डेट करत असल्याची माहिती दिली होती. याशिवाय ललितने असेही सांगितले आहे की आगामी काळात तो सुष्मिता सेनसोबतही लग्न करणार.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा