Sushmita Sen Admin
मनोरंजन

Sushmita Sen : फोटो शेअर करून वाईट फसली सुष्मिता सेन, लोकांना चष्म्यांमध्ये सापडला वोडका

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

Published by : shweta walge

अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या अनेक दिवसांपासून आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) यांच्यासोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच ललित मोदींनी सुष्मितासोबतचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये दोघेही एकमेकांच्या खूप जवळ दिसत होते.

फोटो शेअर करताना ललित मोदींनी हेही कबूल केले की ते आणि सुष्मिता सध्या डेट करत आहेत आणि लवकरच दोघेही लग्न करणार आहेत. ललितसोबतच्या अफेअरमुळे सुष्मिताला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.

मात्र, नंतर सुष्मिता सेनने एका पोस्टद्वारे ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले. आता अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या ट्विटर हँडलवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. या फोटोमध्ये सुष्मिता कारमध्ये बसलेली दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लिहिले की, मी तुमच्यावर प्रेम करते. अभिनेत्रीच्या या फोटोवर काही लोक तिची स्तुती करत असतानाच काही लोकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

सुष्मिताच्या फोटोमध्ये दारूची बॉटल दिसल्यानंतर ट्रोलर्सनी पुन्हा एकदा तिच्यावर हल्ला चढवला आहे. लोक ट्विट करत आहेत आणि विचारत आहेत की, ही व्होडका आहे की व्हिस्की? एका युजरने ट्विट करून लिहिले की, मी व्होडका भाऊ शोधत आहे. त्याचवेळी काही लोक सुष्मिता सेनला ट्रॅफिकचे नियम समजावून सांगत आहेत. लोकांच्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या अफेअरची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. ललितपूर्वी सुष्मिता सेन रोहमन शॉलला डेट करत होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा