Sushmita Sen and Lalit Modi
Sushmita Sen and Lalit Modi Team Lokshahi
मनोरंजन

Sushmita Sen-Lalit Modi : ललीत मोदीसोबतच्या नात्यावर 20 तासानंतर सुश्मिताचे स्पष्टीकरण

Published by : Team Lokshahi

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्याशी लग्न केले असल्याची माहिती समोर येत आहे. या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोघांनी मालदिवमध्ये (Maldiv) लग्न केले, अशाही चर्चा सुरु झाल्या होत्या. तब्बल 20 तास चाललेल्या या चर्चांवर सुश्मिता सेनने प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे.

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी(Lalit Modi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. या पोस्टमध्ये ललित मोदीने अभिनेत्री सुश्मिता सोबतचं आपलं नातं जाहीर केलं. आपण दोघे डेट करत असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं होतं. . ललित मोदी यांनी स्वतः सुश्मिता सेनला ‘बेटर हाफ’ म्हणत तिच्यासोबतचे काही फोटो ट्वीट केले होते. त्या ट्वीटमध्ये ललित मोदी म्हणाले, “कुटुंबासोबत मालदीव, सार्दानियाच्या दौऱ्यावरुन नुकताच लंडनला परतलो. यावेळी माझी ‘बेटर हाफ’ सुश्मिता सेनही सोबत होती. अखेर नवी सुरुवात आणि नवं आयुष्य सुरू झालं आहे. माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही.” अशा आशयाचे ट्विट केलं होतं. शुक्रवारी ही पोस्ट सोशल मीडियावर पडली आणि चर्चा सुरु झाली.

आता यानंतर शुक्रवारी म्हणजे १५ जुलै,२०२२ रोजी सुश्मिता सेनने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खुलाशा केला आहे. सुश्मिताने आपल्या दोन मुलींसोबतचा एक क्युट फॅमिली फोटो शेअर केला. त्यांनी लिहिलं आहे की,''मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळीकडे आनंद भरलेला आहे. मी लग्न केलेलं नाही,ना कुठल्याही अंगठीचा स्वीकार केला आहे. याक्षणी मी फक्त एवढंच सांगेन माझ्या सभोवताली प्रेमच प्रेम आहे. मला वाटतं इतकं स्पष्टीकरण पुरेसं आहे. आता पुन्हा मी बिझी होईन माझ्या आयुष्यात आणि कामात. माझ्या आनंदात कायम तुम्ही सारे सहभागी असता त्याबद्दल धन्यवाद. माझं माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम आहे''.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी सुष्मिता काही दिवसांपासूर्वी रोहमनसोबत रिलेशनशिपमध्ये होती मात्र काही कारणास्तव त्यांचे ब्रेकअप झाले. रोहमन सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्याही खूप जवळचा होता.

आमदार गणेश नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर दिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Yamini Jadhav : निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत, या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच

Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज यांनी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाले...

राज्यात आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्यातील मतदान

"परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान "; ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत आमदार रोहित पवारांनी केले गंभीर आरोप