Sushmita Sen Team Lokshahi
मनोरंजन

Sushmita Sen : सुष्मीताचं लग्न न करण्याचं कारण झालं उघड....

माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांना माझे प्राधान्यक्रम माहीत नव्हते....

Published by : prashantpawar1

सुष्मिता सेन (Sushmita Senan) हिने नुकतच तिचं लग्न न करण्याबाबत खुलासा केला आहे. एका मुलाखतीत तिने सांगितलं की, तिच्या मुली रेनी आणि अलिशा सेन हे तिचं लग्न न करण्याचं कारण कधीच नव्हतं. मिस युनिव्हर्स ?(Miss Universe) सुष्मिता दोन दत्तक मुलींची आई आहे. नुकतच सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl) ब्रेकअप झालं. सुष्मिता म्हणाली की जेव्हा मी रेनीला दत्तक घेतलं तेव्हा माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं. त्यानंतर माझ्या आयुष्यात आलेल्या लोकांना माझे प्राधान्यक्रम माहीत नव्हते. मी कोणाला माझ्या जबाबदाऱ्या वाटून घ्यायला सांगितल नाही. परंतु त्यांनी मला काही गोष्टी शेअर करायला सांगितलं. ती म्हणते की मी माझ्या जबाबदाऱ्या व जबाबदारीपासून दूर राहायलाही सांगू शकत नाही. लग्नाविषयी बोलताना तिने सांगिताना असं म्हटलं आहे की, माझ्या आयुष्यात मला काही अद्भुत लोक भेटले जे मी लग्न न करण्याचे एकमेव कारण म्हणजे ते खूप निराश होते. माझ्या मुलांशी माझ्या आयुष्याचा काहीही संबंध नाही. मी माझ्याकडे माझ्या मुलांना उघड्या मनाने दत्तक घेतले आहे. मी कधीही त्यांना परके असल्याचा भास होऊ दिला नाही. मी सर्वांना समान प्रेम आणि आदर दिला."

सुष्मिता पुढे म्हणाली की तीनदा असे झाले की मी लग्न करणार होते परंतु तिन्ही वेळा मला देवाने वाचवलं. त्याच्या येण्याने माझ्या आयुष्यात किती वादळे आली हे मी सांगू शकत नाही. देवाने माझे आणि माझ्या दोन्ही मुलांचे रक्षण केले. तो मला कोणत्याही अडचणीत येऊ देऊ शकत नव्हता.

" सुष्मिता सेनने 1994 मध्ये मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. यानंतर अभिनेत्रीने 1996 मध्ये महेश भट्ट यांच्या दस्तक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये बीवी नंबर 1, फिजा, आंखे, मैं हूं ना आणि 'मैं प्यार क्यों किया? असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. तिने 2020 मध्ये 'आर्या' या मालिकेद्वारे करिअरला सुरुवात केली. सुष्मिता मागील वर्षीच्या दुसऱ्या सीझनमध्येही दिसली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : थोड्याच वेळात राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

Raj Thackeray - Devendra Fadnavis : राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pune : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऐतिहासिक निर्णय

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज