मनोरंजन

Aarya Season 3 Teaser: अंगावर शहारे आणणारा सुष्मिता सेनचा आर्या-3 चा टीझर रिलीज

सुष्मिता सेन आर्याचा भाग 3 घेऊन परतत आहे. सोमवारी सुष्मिता सेनने आर्या 3 चा टीझर शेअर केला.

Published by : Team Lokshahi

सुष्मिता सेनच्या लोकप्रिय वेब सीरिज 'आर्या'चा पहिला भाग 2020 मध्ये रिलीज झाला होता. पहिला भाग लोकांना इतका आवडला की दुसऱ्या भागाला मागणी आली. तर 2022 मध्ये या मालिकेचा दुसरा भाग रिलीज झाला होता. आता सुष्मिता सेन आर्याचा भाग 3 घेऊन परतत आहे. सोमवारी सुष्मिता सेनने आर्या 3 चा टीझर शेअर केला. सुष्मिता सेनच्या आर्या 3 या वेबसिरीजचा शानदार टीझर रिलीज झाला आहे. 30 सेकंदाच्या या टीझरमध्ये पहिल्या भागाची आणि दुसऱ्या भागाची काही झलक दाखवण्यात आली आहे. तर काही नवीन सीझनही पाहायला मिळतात, ज्यात सुष्मिता सेन आपल्या शत्रूंशी तलवार घेऊन लढताना दिसत आहे.

अलीकडे तिची 'ताली' ही वेब सीरिज रिलिज झाली. यात सुष्मिताने एका ट्रान्सजेंडरची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. तिच्या या भुमिकेचे सर्वांनी खुप कौतुक केले. Jio Cinema वर ही सिरिज प्रदर्शित झाली. आता पुन्हा सुष्मिता तिच्या मोस्ट अवेटेड सीरीज आर्यासाठी चर्चेत आली आहे.

तिच्या या सिरिजचे दोन भाग यापुर्वी रिलिज झाले आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता सुष्मिताने तिच्या आर्या 3 ची सिरिजची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला?

Rain Update : आजपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाने वर्तवला अंदाज

Pune Metro : पुणे मेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मार्गावर दोन नवीन स्थानकांना मंजुरी

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच