मनोरंजन

Sushmita Sen : 'ताली' बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी सुष्मिता सेनच्या 'Tali'चा धडाकेबाज टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा 'ताली' (Taali) ही बहुचर्चित वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. या सीरिजमध्ये सुष्मिता तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजचा पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यामध्ये उक्सुकता वाढली होती मात्र आता या वेबसीरिजचा टीझर नुकतंच आऊट झाला आहे.

प्रदर्शित झालेल्या ‘ताली’ या वेबसीरिजच्या टीझरची सुरुवात गौरी सावंत यांच्या परिचयापासून होते. “नमस्कार मी गौरी. तुमची श्री गौरी सावंत. जिला कोणी हिजडा बोलतं, तर कोणी सामाजिक कार्यकर्ती, कोणी नाटकी म्हणवतं, तर कोणी गेम चेंजर. ही कथा याच सर्व प्रवासाची आहे”, असे यात पाहायला मिळत आहे.

“गाली से ताली तक”, “स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता मला हे तिन्हीही हवं आहे”, असे अनेक डायलॉग यात ऐकायला मिळत आहे.

‘ताली’ ही वेबसीरिज तृतीयपंथी लोकांसाठी झटणाऱ्या, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्यावर आधारित आहे. यात सुष्मिता सेन ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजचा टीझर सध्या चांगलाच चर्चेत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा