मनोरंजन

स्वप्नील जोशीची ‘समांतर २’ वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

मराठीमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली बेव सीरिज म्हणजे 'समांतर'. स्वप्नील जोशीच्या या वेब सीरिजचं खिळवून ठेवणारं कथानक आणि प्रत्येक रहस्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती . या वेब सीजिच्या पहिल्या सिझननंतर प्रेक्षक दुसऱ्या सिझनची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपती आहे. कारण लवकरच हा वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'समांतर-२' ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्कंठा वाढू लागली आहे. शोच्या पहिल्या सिझनमध्ये स्वप्नील जोशीने साकारलेल्या कुमार महाजनने नितेश भारद्वाज यांचा म्हणजेच म्हणजेच सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेत त्याच्या भविष्यात काय घडणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चक्रपाणी यांनी त्यांचा भूतकाळ आणि कुमारचा भविष्यकाळ असलेली डायरी कुमारच्या स्वाधीन केली होती. त्यानुसार कुमारच्या आयुष्यात काही गोष्टी घडतही होत्या आणि एका मनोरंजक वळणावर येऊन ही कथा संपली होती.

एका उत्कंठावर्धक वळणावर हा शो संपल्याने आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर होते. ही उत्सुकता अधिक न ताणता 'समांतर २'चा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा