Taarak Mehta Ka Ooltah Chashma Team Lokshahi
मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashma : दयाबेन गोकुळधाममध्ये परतणार, शोच्या प्रोमोने दिला इशारा

अभिनेत्री दिशा वाकानी म्हणजेच ​​दयाबेन गेली पाच वर्षे टीव्हीच्या लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून गायब होती

Published by : shweta walge

अभिनेत्री दिशा वाकानी (Disha Vakani) म्हणजेच ​​दयाबेन (Dayaben) गेली पाच वर्षे टीव्हीच्या लोकप्रिय कार्यक्रम 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) मधून गायब होती, पण आता शोच्या नव्या प्रोमोने (Promo) चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. कारण दयाबेन लवकरच शोमध्ये परतणार असल्याचे नव्या प्रोमोवरून दिसत आहे. प्रोमोमध्ये दयाबेन स्पष्टपणे साडी नेसलेली दिसत आहे.

सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोवरून असे दिसते की दयाबेनचे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये पुनरागमन होत आहे.

प्रोमोमध्ये असे दिसते की दयाबेनचा भाऊ सुंदरलाल (Sunderlal ) जेठालालला (Jethalal) फोन करतो आणि त्याची बहीण म्हणजेच दयाबेन परत येत असल्याचे सांगतो. जेठालाल सुंदरलालला विचारतो की हा विनोद तर नाही, परंतु सुंदर त्याला त्याची बहीण परत करण्याचे वचन देतो. इतकेच नाही तर प्रोमोमध्ये दयाबेनची एक छोटीशी झलकही दाखवण्यात आली आहे.

2017 मध्ये दिशा वाकानीने शो सोडला होता. आधी तीने मुलीला जन्म दिला, त्यानंतर आता तीला मुलगा झाला आहे. बातम्यांमध्ये अनेक वेळा शोच्या निर्मात्यांनी सांगितले आहे की तो कधीपासून दयाबेनला परत आणायचा विचार करतोय. पण इतकी चर्चा होऊनही दयाबेन शोमध्ये परतल्या नाहीत. पण आता शोचा प्रोमो पाहून चाहत्यांना आशा आहे की दिशा वाकानी शोमध्ये पुनरागमन करणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा