मनोरंजन

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: मनोरंजनाचा 'तो' किस्सा संपला! गोलीनं सोडला शो, दिलीप जोशींनी शेअर केली भावनिक पोस्ट

गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने घराघरात आपले स्थान निर्माण केली असून, या लोकप्रिय मालिकेचे 4,000 पेक्षा जास्त भाग पार पडले आहेत. या मालिकेतील एक कलाकार नुकतीच ही मालिका सोडत असल्याची बातमी समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेने घराघरात आपले स्थान निर्माण केली असून, या लोकप्रिय मालिकेचे 4,000 पेक्षा जास्त भाग पार पडले आहेत. गोकुलधाममधील हे रहिवासी एकत्र कुटुंबाप्रमाणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. या मालिकेने आणि मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. अफाट चाहतावर्ग असणारी ही मालिका नेहमीच चर्चेत असते. सध्या या मलिकेतील कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणाने मालिकेतून निरोप घेत आहेत. जूने कलाकार निरोप घेत असल्यामुळे या मालिकेची लोकप्रियता देखील कमी होत चालली आहे.

दिशा वकानी, शैलेष लोढा, जेनिफर मिस्त्री, गुरुचरण सिंग या कलाकारांनी या मालिकेला निरोप दिला आहे. अशातच या मालिकेतील एक कलाकार नुकतीच ही मालिका सोडत असल्याची बातमी समोर आली आहे. गोली हे पात्र साकारणारा अभिनेता कुश शहा तब्बल 16 वर्षांनी या मालिकेला निरोप देत असल्याच समोर आलं आहे. यादरम्यान मालिकेतील इतर कलाकारांनी त्याच्या निरोपासाठी खास निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभादरम्यान कुश शहा भावूक होताना एका व्हिडिओमध्ये दिसून आला.

याव्यतिरिक्त कुश शहाच्या जाण्याने दिलीप जोशी भावूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांना सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केली आहे. या व्हिडिओवर कुश शहा ला टॅग करत दिलीप जोशी म्हणाले, "हा चिमटा आम्हाला सोडून जाण्यासाठी आहे! मी तुझ्यासोबत केलेल्या प्रत्येक सीनचा आनंद घेतला आहे. तुला पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा! तुला बंदुकीच्या गोली प्रमाणे खूप पुढे जाताना पाहायचं आहे". यासोबत इतर कलाकार ही सोशल मीडियावरून त्याला निरोप देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा