मनोरंजन

मराठी चित्रपटातील सर्वात बोल्ड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज,‘टकाटक २’चा नवा व्हिडीओ समोर

मराठी चित्रपटातील सर्वात बोल्ड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कथांवर आधारीत चित्रपट येत असतात. ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

Published by : Siddhi Naringrekar

मराठी चित्रपटातील सर्वात बोल्ड चित्रपट (Bold Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कथांवर आधारीत चित्रपट येत असतात. ‘टकाटक’. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधील बोल्ड सीनने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याच टकाटक (Takatak) चित्रपटाचा आता दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होत आहे. सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

या चित्रपटातील अभिनेता प्रथमेश परब व्यतिरिक्त नव्या कलाकारांची चित्रपटामध्ये एण्ट्री झाली आहे. अक्षय केळकर, अजिंक्य राऊत, भूमिका कदम, प्रणाली भालेराव, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर आदी कलाकार या चित्रपटात काम करताना दिसतील.

या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून १८ ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये दाखल होणार आहे. ‘टकाटक’च्या (Takatak) पहिल्या भागामध्ये अनेक बोल्ड सीन पाहायला मिळाले. आता या चित्रपटांमध्ये नेमके काय पाहायला मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा