छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील जेठालाल, टप्पू आणि बबीताजी ही पात्र लोकप्रिय आहेत. मात्र, मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा तन्मय वेकरियाची चाहते काही कमी नाहीत. बाघाचे चाहते त्याच्या प्रत्येक गोष्टींचे निरिक्षण करतात. आता बाघाने एका एपिसोडमध्ये ६१ हजार रुपयांची हूडी परिधान केल्याचं त्याच्या चाहत्यांच्या लक्षात आलं आहे. अलिकडेच 'तारक मेहता…' मालिकेची कहानी ही बाघाभोवती फिरताना दिसली. यावेळी बाघाच्या चाहत्यांच लक्ष हे त्याच्या हूडीकडे गेलं. तन्मयने परिधान केलेली हूडी ही बालेंसियागाची आहे. याची खरी किंमत ही ८३० डॉलर म्हणजेच ६१ हजार रुपये आहे. हूडीची खरी किम्मत ऐकूण नेटकरी हैराण झाले आहेत.