मनोरंजन

Jhund Teaser : गल्लीतली पोरं अन् अमिताभ…, नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’चा टीझर प्रदर्शित

Published by : Lokshahi News

मराठमोळा दिग्दर्शक नागराज मंजुळेचा  (Nagraj Manjule) पहिला हिंदी चित्रपट झुंड   (Jhund)  आपल्या भेटीला येत आहे. या बहुचर्चित चित्रपटाचा टीजर रिलीज  (Jhund Trailer Release)  झाला आहे. चित्रपटात बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असून सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या चित्रपटाबद्दल सगळ्यांमध्येच उत्सुकता निर्माण झाली आहे. अभिनेता आकाश ठोसरही   (Akash Thosar)  झळकणार आहे. आकाशने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे.

या चित्रपटाची गेली अनेक दिवस चर्चा होती. परंतु कोरोना महामारीमुळे हा चित्रपट पुढे ढकलला जात होता. नुकताच अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटाची नवी रिलीज डेट जाहीर केली होती. येत्या 4 मार्चला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

बिग बी मराठीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आसून, नागराज मंजुळे यांनी एक टीझर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या टीझरला चांगलीच पसंती मिळत आहे. या टीझरमध्ये अजय-अतुलचे म्युझिक आणि अमिताभ बच्चन यांची एन्ट्री पहायला मिळणार आहे. सोबतच बॅगराऊंडला चित्रपटातील गाण्याचे म्युझिकही ऐकायला मिळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा