मनोरंजन

‘पृथ्वीराज’ सिनेमाचा टीझर रिलीज; लवकरच होणार प्रदर्शित

Published by : Lokshahi News

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अक्षय कुमार या सिनेमात पृथ्वीराज ही मुख्य भूमिका साकारतो आहे.प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सूकता लागली आहे.

पृथ्वीराज या चित्रपटात संजय दत्तही अक्षय कुमारप्रमाणे अॅक्शन करताना दिसत आहे. त्याच प्रमाणे सोनू सूदही एका वेगळ्या अवतारामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. प्रेक्षक नवा लूक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. पृथ्वीराज 21 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

मानुषीने संयोगिताची भूमिका साकारली आहे. हा मानुषीचा पहिला चित्रपट आहे आणि 2022 च्या बहुप्रतिक्षित पदार्पणापैकी एक आहे. यश राज फिल्म्सची निर्मिती असलेल्या पृथ्वीराजचे दिग्दर्शन डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले असून त्यांनी भारतातील सर्वाधिक प्रभावशाली राजनीतितज्ञ चाणक्य यांचे भव्य महाचरित्र टेलिव्हिजनवर दिग्दर्शित केले होते.

अक्षय सांगतो, पृथ्वीराज चौहान दिग्गज व्यक्ति असून एक शूर योद्धा आहे " महान योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांना भीती ठाऊक नव्हती. शौर्य हा त्यांच्या जीवनाचा गाभा राहिला. मी त्यांच्याविषयी जितके वाचले, त्यांचा जीवनप्रवास वाचून मी थक्क झालो. या वीराने त्याचा प्रत्येक श्वास देश आणि स्वत:च्या मूल्यांकरीता घेतला."धाडसी शूराला समर्पित केलेल्या मानवंदनेला जगभरातील भारतीय प्रेमाचा वर्षाव करतील ही अपेक्षा करतो. योद्ध्याची जीवन कथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही कलाकृती त्याचे शौर्य आणि साहसाला वाहिलेली वंदना आहे."

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...