लोकशाही मराठीच्या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबरला पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद पार पडत आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सकाळी 10 वाजल्यापासून सुरवात झाली असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहिले आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. यासह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे. याचपार्श्वभूमिवर तेजस्विनी पंडित यांच्या आई स्वर्गीय ज्योती चांदेकर यांचा लोकशाही मराठीच्या "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमात पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी येथे त्यांनी मुलगी तेजस्विनी पंडित उपस्थित होत्या.
दरम्यान पुरस्कार देण्यापुर्वी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ नेत्या ज्योती चांदेकर यांच्या जीवनावर आधारित एक चित्रफित लोकशाही मराठीच्या "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमात दाखवण्यात आली. यावेळी तेजस्विनी पंडित भावून होऊन तिला रडू कोसळलं. आईच्या आठवणी तिच्या समोर पुन्हा जाग्या झाल्यामुळे आईच्या आठवणीने तिचे मन हेलावलं आणि तिच्या डोळे पाणावले.