मनोरंजन

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे यांच्यासाठी भावनिक पोस्ट लिहिली आहे. 'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू' असे ती म्हणाली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडले. तर विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव करून महायुतीने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीसह मनसेचा देखील या निवडणूकीत पराभव झाला त्यामुळे राज ठाकरेंना या निवडणुकीत यश मिळाले नाही. याचपार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट करत तिची प्रतिक्रिया मांडली आहे. तेजस्विनीने राज ठाकरेंसाठी ही भावनिक पोस्ट केली आहे.

याआधी मतदानाच्या दिवसा आधी तेजस्विनीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती ज्यात ती म्हणाली होती की,

"महाराष्ट्रात गरीबापासून श्रीमंतापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत , कुणावरही कठीण संकट आलं आणि त्यावर मार्ग सापडत नसेल तर, सगळे शिवतीर्थावर धाव घेतात आणि मार्ग सापडतोच. राज ठाकरे खंबीरपणे आपल्या मागे उभे आहेत हा विश्वास आपल्याला आहे. आता आपण खंबीरपणे राज साहेबांच्या मागे उभे राहूया. 20 तारखेचा सूर्योदय हा नवनिर्माणाचा असावा त्यासाठी रेल्वे इंजिन च बटण दाबून मनसेच्या उमदेवारांना विजयी करूया …"

विधानसभा निकालादरम्यान तेजस्विनी ट्वीट करत म्हणाली की,

"विजयी उमेदवारांचं अभिनंदन ! कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या micro management ला १००/१०० पण तरीही राजसाहेब ठाकरे आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू "

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या

Sanjay Raut : 'राज्याच्या सामाजिक, राजकीय वातावरणात नवे बदल घडणार'; संजय राऊतांचं विजयी मेळाव्याबाबत सूचक वक्तव्य