टेलिव्हिजनवरील 'सोनी टीव्ही' वाहिनीवरील 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' हा कार्यक्रम सध्या खूप चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकार सहभागी झालेले दिसून आले. उषा नाडकर्णी, निक्की तांबोळी, गौरव खन्ना, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर असे अनेक कलाकार सहभागी झाले आहेत. या कार्यक्र्माचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी दीपिका कक्कर व उषा नाडकर्णी हे वेगळ्या कारणामूळे चर्चेत असलेल्या बघायलाच मिळाल्या. मात्र आता निकी तांबोळी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. नक्की एका भागामध्ये भावुक झालेली दिसून आली आहे.
'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये सहभागी स्पर्धकांना वेगवेगळे टास्क दिले जातात. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये परीक्षकांनी कुटुंबातील सदस्यांच्या आठवणीमध्ये खास पदार्थ बनवण्यास सांगितला होता. मात्र या टास्कपूर्वी सदस्यांना काही फोटो दाखवण्यात आले. निक्कीलादेखील तिच्या लहाणपणीचा फोटो दाखवण्यात आला. या फोटोमध्ये तिच्याबरोबर एक लहान मुलगादेखील होता. हा फोटो पाहून निक्कीच्या डोळ्यात अश्रू बघायला मिळाले. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून तिच्याबरोबर कोण आहे?, असं विचारण्यात आले. त्यावर तिने तो भाऊ आहे मात्र या जगात नसल्याचे तिने सांगितले.
त्यानंतर फराह खानने विचारले की, "त्याचं वय काय होतं?", त्यावर निक्कीने उत्तर दिले की, "तो माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता", त्याचं निधन कसं झालं? असे विचारल्यानंतर ती म्हणाली, "कोरोना काळात त्याचे आजाराने अनेक अवयव निकामी झाले होते. त्यामुळे तो जगू शकला नाही". पुढे ती म्हणाली की, "मी घरी रडू शकत नाही. आईवडीलां समोर मी रडले तर तेदेखील रडू लागतील". हे सांगताना निक्की खूप भावुक झालेली बघायला मिळाली. तसेच तिच्या अश्रूंचाही बांध फुटला.
निक्कीची परिस्थिती बघून फराह तिला समजावताना दिसली. ती म्हणाली की, "तुझा भाऊ नेहमी तुझ्यासोबत आहे. तू नेहमी आनंदी राहावं अशी त्याची इच्छा असणार आहे. तो नेहमीच तुझ्यावर प्रेम करेल". दरम्यान सध्या 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'ची लोकप्रियता खूप जास्त असलेली बघायला मिळत आहे.