बॉलिवूड इंडस्ट्रीतील मंडी, मोहरा सारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली क्षमता सिद्ध करणारा अभिनेता नसीरुद्दीन शाह (Nasruddhin Shaha) हा सिनेविश्वातील सर्वात दिग्गज अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. नसीरुद्दीन शाह यांचा चित्रपट प्रवास हा खूप मेहनत व संघर्षानंतर बॉलिवूड मध्ये आपला जम बसवला आहे. अभिनयाच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक अडचणींमुळे नसीरुद्दीन शाह जरीच्या कारखान्यात काम करायचे. अभिनयातून फार काही कमावता येत नसल्याने यातूनच त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा.
नसीरुद्दीन शाह कठोर परिश्रम करण्यात कधीच मागे पडले नाहीत. ज्या काळात त्यांनी चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती त्या काळात त्यांना फारसे आपल्या कामाचे फारसे पैसे मिळू शकले नाहीत. यामुळे नसीरुद्दीन झरी या कारखान्यात काम करू लागले. या मेहनतीने त्यांनी दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार या दिग्गज अभिनेत्याने ताज हॉटेलमध्ये बेल बॉयच्या नोकरीसाठी अर्जही केला होता.
याच मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे नसीरुद्दीन शाह हे नाव बॉलिवूडमध्ये मोठे आहे. नसीरुद्दीन शाह यांनी वयाच्या 14 व्या वर्षापासून थिएटरमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मोठे पुरस्कारही पटकावले आहेत. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊन गौरविले आहे. नसीरुद्दीन शाह यांनी भारतीय चित्रपटांसोबतच अनेक परदेशी चित्रपटांमध्येही आपलं जबरदस्त अभिनय कौशल्य दाखवलं आहे. त्यांनी साकारलेली चित्रपटातली व्यक्तिरेखा त्यांनी अजरामर केली हे त्यांचे मोठे वैशिष्ट्य आहे. मोहरा चित्रपटातील जुंदालच्या भूमिकेप्रमाणे मंडीतील डुंगरूस आणि पारमधील नौरंगियाची भूमिका. नसीरुद्दीन शाह यांची अशी अनेक पात्रे आहेत जी लोकांच्या मनात घर करून आहेत.