मनोरंजन

Jawan Movie Ticket: शाहरुखच्या ‘जवान’ची क्रेझच भारी! फक्त एवढ्या रुपयांत थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

Published by : Team Lokshahi

सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. ‘जवान’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान स्टारर ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे सिनेमाच्या ॲडव्हान्स बुकिंगला दमदार सुरुवात झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंग दरम्यान सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ॲडव्हान्स बुकिंग दरम्यान सिनेमाचं एक तिकिट तब्बल 2 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. देशातील मेट्रो शहरांमध्ये सिनेमाच्या तिकिटांचे दर फार जास्त आहेत. ज्यामध्ये चेन्नई, बंगलोर, दिल्ली, मुंबई यांसारख्या शहरांचा समावेश आहे. पण ‘जवान’ सिनेमा तुम्हाला 60 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.

शाहरुख खान याचा ‘जवान’ सिनेमा फक्त 60 रुपयांमध्ये कधी आणि कसं पाहता येणार हे जाणून घ्या… कोलकात्याच्या एका चित्रपटगृहात अवघ्या 60 रुपयांमध्ये जवानाच्या सिनेमाच्या प्रदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणून कोलकात्या येथील किंग खान याच्या चाहत्यांना फक्त 60 रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे.

चित्रपटगृहात वरच्या भागातील तिकिटांची किंमत 80 रुपये आहे. कोलकाता येथील लाली चित्रपटगृह आणि पद्मा चित्रपटगृहात देखील 60 आणि 80 रुपयांमध्ये सिनेमा पाहता येणार आहे. तर बसुश्री चित्रपटगृहात ‘जवान’ सिनेमाच्या तिकिटांची विक्री 100 आणि 150 रुपयांमध्ये होत आहे.

मुंबई शहराबद्दल सांगायचं झालं तर, डोंगरी येथे असलेले प्रीमियर गोल्ड चित्रपटगृहात ‘जवान’ सिनेमाच्या तिकिटांची विक्री सर्वात कमी रुपयांमध्ये होत असल्याची माहिती मिळत आहे. प्रीमियर गोल्ड चित्रपटगृहात ‘जवान’ सिनेमा सिनेमाचं तिकिट 100 ते 112 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत.

दिल्ली याठिकाणी अनेक सिनेमागृहांमध्ये ‘जवान’ सिनेमाचं तिकित स्वस्त दरात मिळत आहे. दिल्लीतील अम्बा चित्रपटगृहात ‘जवान’ सिनेमाच्या तिकिटांची विक्री 75 रुपयांमध्ये होत आहे. तर शहरातील सर्वात प्रसिद्ध डिलाइट सिनेमा सिनेमागृहात ‘जवान’ सिनेमाच्या तिकिटांची विक्री 95 रुपयांमध्ये होत असल्याची माहिती मिळत.

शाहरुख खान स्टारर जवान सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक अटली कुमार यांनी केलं आहे. सिनेमात शाहरुखसोबतच नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा आणि विजय सेतुपती सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमा 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

The sound of Breaking Fingers : बोटे मोडल्याने आवाज कसा येतो माहीत आहे का? नसेल माहित जाणून घ्या...

Ind Vs Eng : हेझलवूडचा 'तो' सल्ला ऐकला अन् आकाश दीपने इंग्लंडचा फडशा पाडला

Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी

Pune Crime : पुण्यातील अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; Delivery Boy आरोपी हा निघाला तरुणीचा मित्र