दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २- द रुल' चित्रपट मागील वर्षी रिलीज झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा 2' ने सुमारे जगाभरात 1,750 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच भारतामध्ये 1,233.83 कोटी रुपये कमाई केली असून, भारतामध्ये 'पुष्पा २' हा ब्लॉकबास्टर चित्रपट ठरला आहे. दुसऱ्या भागानंतर चाहते पुष्पाच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. तिसरा भाग कधी येणार? पुढे गोष्ट काय असणार? यासर्व चर्चा सुरु होत्या.
यासगळ्या चर्चा सुरु असतानाच चित्रपटाचे निर्माते रवी शंकर यांनी मोठी अपडेट दिली आहे. आता 'पुष्पा3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रवी शंकर यांनी एका मुलाखतीमध्ये 'पुष्पा3' चित्रपटाचा खुलासा केला आहे. अल्लू अर्जुन हा तमिळ दिगदर्शक अॅटलीसोबत एका प्रोजेक्टवर काम करत आहे. दिग्दर्शक त्रिविक्रम यांच्या आगामी चित्रपटामध्ये अल्लू अर्जुन मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्ष लागणार आहे. त्यानंतर 'पुष्पा3' चित्रपटावर काम केले जाणार आहे.
निर्माते रवी शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 'पुष्पा3' हा चित्रपट 2028 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट पहिल्या दोन भागापेक्षा रंजक आणि भव्यदिव्य असणार असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. अशी माहिती चित्रपटाचे संवादलेखक श्रीकांत विसा यांनी दिली. या चित्रपटात नव्या व्यक्तीरेखा पाहायला मिळणार आहे. परंतु या चित्रपटाची कोणतीही आधिकृत घोषणा झालेली नाही.