Nyasa Devgan Lokshahi Team
मनोरंजन

पुन्हा चर्चेला उधाण; अजयची मुलगी न्यासा येणार बॉलिवूडमध्ये ?

अजयची मुलगी न्यासाबद्दल चाहत्यांमध्ये बॉलिवूड पदार्पणाविषयीची चर्चा

Published by : prashantpawar1

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स आपल्या पॉप्युलरिटीमुळे ओळखले जातात. अगदी महेश भट (mahesh bhat) यांची मुलगी आलिया भट(alia bhat) हिने देखील वयाच्या 18 व्या वर्षी ' student of the year 'या चित्रपटात डेब्यू करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचबरोबर सैफची मुलगी सारा अली खान(sara ali khan) ही देखील स्टार किड्सपैकी एक म्हणता येईल. अशी बरीच उदाहरणे आहेत जी बॉलिवूड स्टार किड्स म्हणून त्यांची ओळख आहे. बॉलिवूडचे बरेच स्टारकिड्स एकापाठोपाठ एक डेब्यू करत आहेत.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा नामांकित सुपरस्टार अजय देवगण(superstar ajay devgan)यांची मुलगी न्यासा देवगण(Nyasa devgan) बद्दल काही माहिती समोर येत होती. ती म्हणजे न्यासाच्या बॉलिवूड पदार्पणाबद्दलची. न्यासा ही मोस्ट पॉप्युलर स्टार किड्स म्हणून तिची ओळख आहे. चित्रपटांमध्ये पदार्पण करण्याआधीच तिची मोठी फॅन फॉलोइंग सुद्धा बनलेली आहे. चाहत्यांमध्ये अगदी चर्चेचा विषय ठरतोय तो म्हणजे न्यासाने आपल्या आई आणि वडीलांसारखं अभिनयाच्या क्षेत्रात आपलं देखील करिअर बनवावं.

आपल्या मुलीबद्दल चाहत्यांनी प्रश्न विचारला असताना अजय देवगण एका मुलाखतीमध्ये सांगतात की न्यासाने काय करावं तो तिचा निर्णय आहे. तिच्या निर्णयानुसार तिचं करिअर तिने निवडलं पाहिजे. आणि त्यानुसार तिने मेहनत घेणं देखील अगदी तेवढच महत्त्वाचं ठरतं. अजयला दिग्दर्शनामध्ये अधिक रस होता त्यांनी सांगितलं. असं असताना देखील त्यांच्या वडिलांच्या इच्छा होती की त्याने अभिनय क्षेत्रात काम करावं. अगदी या कारणामुळेच मी आज इथपर्यंत आलो असं देखील त्याने या दरम्यान आपल्या चाहत्यांना सांगितलं

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."