लोकशाही न्यूज नेटवर्क
अॅमेझॉन प्राइमवरील अभिनेता मनोज वाजपेयीची यांची गाजलेली वेब सीरिज म्हणजे 'द फॅमेली मॅन'. या सीरिजचा पहिला भाग गाजल्यामुळे त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र, आता या सीरिजसाठी आणखी काही काळ प्रेक्षकांना वाट पाहावी लागणार आहे. कारण, या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. दिग्दर्शक राज आणि डीके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
"आम्हाला माहित आहे तुम्ही सर्वच 'द फॅमेली मॅन'च्या नव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत आहात. त्यामुळे आमच्यावर इतकं प्रेम केल्यामुळे मनापासून धन्यवाद. 'द फॅमेली मॅन 2'ही सीरिज उन्हाळ्याच्या सुट्टीत अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. एक चांगली कलाकृती तुमच्यासमोर सादर करता यावी यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे तुम्हाला ती नक्की आवडेल", अशी पोस्ट दिग्दर्शकांनी केली आहे.
हे असले तरी काही दिवसांपूर्वीच 'द फॅमेली मॅन 2' या सीरिजचा एका प्रोमो शेअर करण्यात आला होता. यात त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. या प्रोमोनुसार, 'द फॅमेली मॅन 2' ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदर्शित होणार होती.