मनोरंजन

Kamal Haasan: 'इंडियन 2' ची पहिली झलक आली समोर; 'या' भूमिकेत झळकणार कमल हासन

साऊथ सुपरस्टार कमल हसनच्या 'इंडियन 2' या चित्रपटाची पहिली झलक समोर आली असून निर्मात्यांनी त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे.

Published by : Team Lokshahi

साऊथ सुपरस्टार कमल हसनच्या 'इंडियन 2' या चित्रपटाची पहिली झलक समोर आली असून निर्मात्यांनी त्याची रिलीज डेटही जाहीर केली आहे. या चित्रपटात रकुल प्रीत सिंग, प्रिया भवानी शंकर आणि सिद्धार्थसारखे कलाकार आहेत. हा चित्रपट कमल हासनच्या वाढदिवसाच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे.

कमल हासन आणि शंकर यांच्या 'इंडियन 2' या चित्रपटाची पहिली झलक ३ नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून, चित्रपट पाहणारे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाचे निर्माते लायका प्रॉडक्शननेही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे, 'सेलिब्रेशन लवकर सुरू झाले आहे.

कमल हासन आणि शंकर यांचा 'इंडियन 2' हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. 'इंडियन 2'च्या निर्मात्यांनी एक ट्वीट शेअर करत लिहिलं आहे,"इंडियन 2'साठी सज्ज व्हा..3 नोव्हेंबरला सिनेमा होणार प्रदर्शित..'इंडियन 2'ची पहिली झलक समोर".

'इंडियन 2'च्या पोस्टरमध्ये कमल हासन दिसत आहेत. कमल हासन यांचा 7 नोव्हेंबरला वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त 'इंडियन 2' हा सिनेमा 3 नोव्हेंबरला रिलीज करण्यात येणार आहे. कमल हासनचा 'इंडियन 2' हा सिनेमा 1996 मध्ये आलेल्या 'इंडियन' या सिनेमाचा सीक्वेल आहे. या सिनेमात ते स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमातही भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना ते दिसतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी