‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटात प्रभास एका नव्या अवतारामध्ये दिसणार आहे. चित्रपटामध्ये प्रभू श्रीराम यांची भूमिका प्रभास साकारली आहे. त्याच्या व्यतिरिक्त क्रिती सेनॉन ही जानकीच्या आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत.
नुकतंच प्रभासने सोशल मीडियावर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये श्रीराम यांच्या अवतारातला त्याचा लूक समोर आला आहे. २ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा टीझर अयोध्यामध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता देवदत्त नागे देखिल असणार आहे.
‘आदिपुरुष’ हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘रामायण’ या महाकाव्यावर आधारित असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोस्टरला कॅप्शन देताना प्रभासने “|| आरंभ || अयोध्यानगरीतील शरयू नदीच्या काठावर सुरु होणाऱ्या अद्भुत प्रवासाचे साक्षीदार व्हा. चित्रपटाचे पहिले पोस्टरचे अनावरण करताना फार आनंद होत आहे. चित्रपटाचा टीझर २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजून ११ मिनिटांनी प्रदर्शित होणार आहे”, असे म्हटले आहे.