मनोरंजन

'मायलेक' चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित

Published by : Siddhi Naringrekar

ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत प्रियांका तन्वर दिग्दर्शित 'मायलेक' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण… या चित्रपटात झळकणाऱ्या खऱ्या मायलेकी. टिझरमधून आपण त्यांची सुंदर केमिस्ट्री पाहिली. आता टिझरनंतर या चित्रपटातील पहिले जबरदस्त गाणे प्रदर्शित झाले असून यातून मायलेकींची मैत्री समोर येत आहे. 'असताना तू' असे या गाण्याचे बोल आहेत. हे सुरेख आणि हॅपनिंग गाणे पंकज पडघन यांनी गायले असून त्याला सावनी भट यांची साथ लाभली आहे. पंकज पडघन यांचेच अफलातून संगीत याला लाभले आहे. तर क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे.

या गाण्यातून आई आणि मुलीच्या नात्यातील बॅाण्डिंग दिसत आहे. प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत आहोत, असा या गाण्याचा सार आहे. चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश कामत, बिजय आनंद, शुभांगी लाटकर, संजय मोने यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर कल्पिता खरे, बिजय आनंद या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे असोसिएट प्रोड्यूसर आहेत. या आई आणि लेकीची सुंदर केमिस्ट्री १९ एप्रिलला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

या गाण्याबद्दल सोनाली खरे म्हणते, '' अगदी खरं सांगायचे तर माझ्या आणि मायरावर चित्रित करण्यात आलेले हे गाणे आम्हा दोघींना अगदी तंतोतंत जुळते. आमचे प्रत्यक्षात असेच गोड नाते आहे. कदाचित त्यामुळेच आमच्यातील ही केमिस्ट्री पडद्यावर नैसर्गिक दिसत असावी. गाणे रॉकिंग असल्याने रेकॉर्डिंगलाही प्रचंड धमाल आली. मुळात गाण्याची टीम अतिशय हॅपनिंग आहे. आई आणि मुलीमधील सुंदर नाते उलगडणारे हे गाणे आहे.''

हरियाणात भाविकांच्या बसला भीषण आग

अमरावती महापालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशी स्थगित

शिवाजी पार्कात PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाकरेंची 'राज'गर्जना; म्हणाले,"समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा..."

"भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला बंद केलं असतं, तर..."; शिवाजी पार्कमध्ये PM नरेंद्र मोदींनी केला मोठा खुलासा

"शिवसेनाप्रमुखांची डरकाळी शिवाजी पार्कमध्ये घुमायची, पण आज उबाठाने..." CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका