मनोरंजन

Main Atal Hoon Movie Song: ‘मैं अटल हूं’ चित्रपटाचे 'देश पहले' हे पहिले गाणे प्रदर्शित

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंतीचे औचित्य साधून पंकज त्रिपाठी अभिनीत ‘मैं अटल हूं’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘देश पहले’ पहिले गाणे प्रदर्शित केले.

Published by : Team Lokshahi

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 99 व्या जयंतीचे औचित्य साधून पंकज त्रिपाठी अभिनीत ‘मैं अटल हूं’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘देश पहले’ पहिले गाणे प्रदर्शित केले. पंकज त्रिपाठीने इन्स्टाग्रामवर या खास प्रसंगी पहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. इतिहासाचे पुनर्लेखन करणारे कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या विश्वात हे गाणे आहे. जुबिन नौटियाल यांनी गायलेले हे हृदयस्पर्शी गीत मनोज मुंतशिर यांनी लिहिले असून पायल देव यांनी संगीतबद्ध केले आहे.

‘मैं अटल हूं’ या चित्रपटात पंकज त्रिपाठी अटलबिहारी वाजपेयीयांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच निर्मात्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला. ट्रेलर लाँचदरम्यान त्याने राजकारणातील आपली आवड आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या बायोपिकची तयारी कशी केली याबद्दल खुलासा केला. महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत प्रवेश करतानाचा एक गमतीशीर किस्साही त्यांनी सांगितला.

रवी जवध यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मैं अटल हूं' हा चित्रपट पुढील वर्षी 19 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूं' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'मैं अटल हूं' या चित्रपटासोबतच पंकज हे लवकरच स्त्री 2 आणि मिर्झापूर 3 मध्ये दिसणार आहे.

पंकज त्रिपाठी, चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते विनोद भानुशाली आणि निर्माते संदीप सिंग यांच्या उपस्थितीत 'मैं अटल हूं' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट आज मुंबईत पार पडला. 'देश पहले' हे गाणे जुबिन नौटियाल यांनी गायलेले गाणे, या गाण्याचे गीतकार मनोज मुंतशिर हे आहेत तर पायल देव यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा