मनोरंजन

अब्दू रोझीकच्या नावाने आता गेमिंग वर्ल्डला सुद्धा ओळख

अब्दू रोझीक हा मूळ तजाकिस्थान मधील राहणार एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.

Published by : Team Lokshahi

अब्दू रोझीक हा मूळ तजाकिस्थान मधील राहणार एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. याची गायक, संगीतकार आणि बॉक्सर म्हणून ओळख ही जग प्रसिद्ध आहे. तसेच इंस्टाग्राम, फेसबुक आणि अन्य फ्लॅटफॉर्म वर ह्याची ओळख ही विनोदी कलाकार म्हणून आहे. लोकांना आपल्या विनोदी अंदाजाने हसवून अब्दू ने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे . तसेच आपल्या आवाजाने व चेहऱ्याने प्रसिद्ध असणारा हा कलाकार आता आपल्या येणाऱ्या नवीन गेम ने सुद्धा आता गेमिंग वर्ल्ड मध्ये आपली जागा निर्माण करणार आहे. बिग बॉस हिंदी ह्या रिअॅलिटी शोचा तो स्पर्धक होता. आता तो बॉलीवूड मध्ये आपली ओळख बनवत आहे. बिग बॉस मधील त्याच्या खेळाने त्याने प्रेक्षकांची मनं जिकंली.

अब्दू रोझीक ने आपल्या आवाजाने ओळख बनवायला सुरवात केली तसेच जग प्रसिद्ध ए आर रहमान ह्या गीतकारासोबत त्याने लाईव्ह सिंगिंग करून लोकांची मनं जिंकली आहेत. पुढे जाऊन अब्दू रोझीक ह्याने अनेक अभिनेत्यांसोबत सोबत इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवले आहेत. बिग बॉस ह्या शो दरम्यानच अब्दू रोझीकला गेमिंग वर्ल्ड मध्ये आपली ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. या संधी मुळे अब्दू रोझीक ला बिग बॉस शो अर्ध्यात सोडून काही दिवसासांठी घराबाहेर जावे लागले. अब्दू रोझीक वर गेम येणार हे त्याच्या चाहत्त्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तसेच अनेक चाहत्यांनी त्याला त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार