मनोरंजन

‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद? ‘द काश्मीर फाईल्स’चा वाद की काही दुसरे कारण……

Published by : Vikrant Shinde

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) जो दर शनिवार-रविवारी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा शो लवकरच बंद होणार असल्याचं कळतंय.

'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटांच्या प्रमोशनवरून निर्माण झालेल्या वादावरून सोशल मिडीयावर  'बॉयकॉट कपिल शर्मा', (Boycott Kapil Sharma) 'बॉयकॉट द कपिल शर्मा शो' हा हॅशटॅग ट्रेंड (Hashtag trend) झाला होता. या चित्रपटांच्या वादामुळे 'द कपिल शर्मा शो' बंद होतोय, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीही नाहीये. मुळात कारण वेगळंच आहे.पण कपिल शर्माने शो बंद होणार असल्याच्या काही बोलेल नाही. तरी माहितीनुसार 'द कपिल शर्मा शो' लवकरच ऑफ एअर होणार आहे आणि हा निर्णय स्वत: कपिल शर्माचा आहे.

कपिल येत्या 11 जून ते 3 जुलैपर्यंत युएस-कॅनडा (US-Canada) टूरवर आहे.याकाळात कपिलसोबत त्याची अख्खी टीम या टूरमध्ये बिझी असणार आहे.याशिवाय आणखी काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे कपिलने एक छोटासा ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. 'द कपिल शर्मा शो'मधून काही महिन्यांचा ब्रेक घेऊन पुन्हा नव्या सीझनसह परतण्याचा त्याचा इरादा आहे. सोशल मीडियावर 'बॉयकॉट कपिल शर्मा' हा हॅशटॅग जोरदार ट्रेंड झाला होता. 'द काश्मीर फाईल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर हा ट्रेंड सुरू झाला होता.त्यांच्या या ट्विटवर अनेकांनी कपिलला ट्रोल केलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा