The Kapil Sharma Show Team Lokshahi
मनोरंजन

'द कपिल शर्मा शो' बंद होणार? वाचा नक्की काय आहे कारण?

सीझनचा शेवटचा भाग जूनमध्ये प्रसारित होईल.

Published by : Sagar Pradhan

मागील काही वर्षांपासून कपिल शर्माचा 'द कपिल शर्मा शो' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या प्रचंड पंसतीस पडत आहे. परंतु, आता या शोच्या फॅनसाठी एक वाईट बातमीसमोर येत आहे. एका माध्यमाच्या माहितीनुसार, 'द कपिल शर्मा शो' हा काही काळासाठी बंद होणार असल्याची बातमीसमोर आली आहे. हा शो तात्पुरता बंद होणार आहे. कपिलला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवण्यासाठी ब्रेक घ्यायचा आहे. त्याच वेळी, निर्मात्यांना या ब्रेक दरम्यान शो आणि काही कलाकारांमध्ये बदल करण्याची संधी देखील मिळेल. यामुळे हा ब्रेक घेतला जात असल्याचे समजत आहे.

हे आहे शो बंद होण्याचे कारण?

मीडिया रिपोर्टनुसार, 'सीझन ब्रेकने शोसाठी खरोखर काम केले आहे, ज्यामुळे आम्हाला सामग्री आणि कलाकारांच्या बाबतीत गोष्टी सुधारण्याची संधी मिळाली. तसेच, कॉमेडी हा एक कठीण प्रकार आहे आणि कलाकारांना ब्रेक आवश्यक आहे जेणेकरून त्यांना कंटाळा येऊ नये. असे कारणसमोर येत आहे. सोबतच सूत्राने सांगितले की त्याची अंतिम तारीख अद्याप निश्चित झालेली नाही परंतु टीम मे महिन्यात शूट पूर्ण करेल. अशा प्रकारे सीझनचा शेवटचा भाग जूनमध्ये प्रसारित होईल. अशी माहिती समोर येत आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही...

कपिल शर्माचा आंतरराष्ट्रीय दौराही आहे, त्यामुळेही ब्रेक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टीम शेवटच्या शूटसाठी नियोजन करत आहे. त्याचबरोबर हा शो कोणत्या दिवशी ऑफ एअर होणार याचा तपशील अजून येणे बाकी आहे. त्याच वेळी, शोचे निर्माते किंवा कपिल शर्मा यांच्याकडून या अहवालांवर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा