मनोरंजन

The Kashmir Files | 100 कोटी क्लबमध्ये धमाकेदार एंट्री

Published by : Team Lokshahi

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित (Directed) 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाची देशभर धुमाकूळ सुरू आहे. बॉक्स ऑफिसवर (Box office) हा चित्रपट दररोज रेकॉर्ड (Record) बनवत आहे. आज, या चित्रपटाला चित्रपटगृहांमध्ये एक आठवडा पूर्ण होण्याआधीच, चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली आहे.

कश्मिरी पंडितावर झालेल्या अत्याचारावर आधारित 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटात अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि अनेक अभिनेत्याने काम केले आहे. पहिल्या दिवसापासुन चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेकक्षकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचे शो हाऊसफुल्ल चालू आहेत.
विवेक अग्निहोत्रीने "द काश्मीर फाइल्स" हा चित्रपट 15 कोटीच्या छोट्या बजेटमध्ये बनवला आहे. हा चित्रपट 11 मार्चला चित्रपटगृहात (Cinema) प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्या दिवशी 3.55 कोटीचा व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी हि रक्कम दुप्पट झाली आणि तीसऱ्या दिवशी तर या चित्रपटाने तब्बल 15.10 कोटीची कमाई केली. तसेच या चित्रपटाने सहाव्या दिवशी 18.05 कोटी आणि सातव्या दिवशी तब्बल 19.05 कोटीचां गल्ला जमा केला आहे. गुरुवारच्या कलेक्शननंतर (collection) 97.30 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्डवाइड (Worldwide) चित्रपटाची कमाई 100 कोटींच्या पुढे गेली आहे.

पहिल्या दिवशी हा चित्रपट 630 स्र्किन्सवर प्रदर्शित झाली होती पण आता दुसऱ्या आठवड्यात स्र्किन्सची संख्या 4000 झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा