बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा 'द काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. ही याचिका उत्तर प्रदेशातील रहिवासी इंतेझार हुसेन सईद यांनी केली होती. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित चित्रीकरण दिसत असल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाऊन हिंसाचार होण्याची शक्यता असल्याची या याचिका दाखल करण्यात आली, परंतु आता स्थगितीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला असल्याने 'द काश्मीर फाईल्स' हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
आता मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांना दिलासा मिळाला आहे.'द काश्मीर फाईल्स' चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे स्थालांतरावर आणि निर्दयी हत्या यावर आधारित आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty), दर्शन कुमार (Darshan Kumar), पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) पाहायला मिळणार आहेत.