THE KERALA STORY 2 GOES BEYOND TEASER RELEASE | VIPUL AMRUTLAL SHAH | FEBRUARY 2026 
मनोरंजन

The Kerala Story 2: विपुल अमृतलाल शाह यांची ‘"द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्ड"’चा टीझर रिलीज

Bollywood Teaser: द केरळ स्टोरी २: गोज बियॉन्डचा टीझर प्रदर्शित झाला असून, अधिक तीव्र, गंभीर आणि वास्तववादी कथानकाची झलक यात पाहायला मिळते.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रोडक्शन हाऊसकडून येणारा द केरला स्टोरी 2 हा चित्रपट आहे. आँखें, नमस्ते लंडन, सिंह इज़ किंग, फोर्स, कमांडो: ए वन मॅन आर्मी, हॉलिडे: ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी अशा अनेक प्रभावी चित्रपटांची त्यांची फिल्मोग्राफी आहे. भारतीय सिनेमावर ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांपैकी ते एक मानले जातात. द केरला स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपण निर्भीड फिल्ममेकर आहोत, हे सिद्ध केलं होतं आणि हाच बेधडक दृष्टिकोन त्यांच्या संपूर्ण कामात सातत्याने दिसतो.

भीती, राग आणि सत्याने भरलेल्या प्रत्येक फ्रेमसह द केरला स्टोरी 2: गोज बियॉन्डचा टीझर पहिल्या भागापेक्षा अधिक तीव्र आणि गंभीर संकेत देतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेते कमाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात तीन हिंदू मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे. या भूमिका उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया यांनी साकारल्या आहेत. तीन मुस्लिम तरुणांवर प्रेम केल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कसा भयावह वळण मिळतो आणि हळूहळू धार्मिक धर्मांतरणाच्या एका सुनियोजित अजेंड्याचा उलगडा कसा होतो, हे चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

विश्वास, आपुलकी आणि भावनिक नात्यांपासून सुरू झालेली ही गोष्ट लवकरच फसवणूक, नियंत्रण आणि अडकवून टाकण्याच्या भीषण कथेत बदलते. टीझरमध्ये स्पष्टपणे दिसतं की कसं प्रेमाला शस्त्र बनवलं जातं, ओळख हिरावून घेतली जाते आणि श्रद्धेला संघर्षाचं मैदान बनवलं जातं. संपूर्ण वातावरण तणावपूर्ण आणि अस्वस्थ करणारं असून, प्रत्येक दृश्य भीती आणि दडपलेल्या संतापाने भरलेलं आहे.

हा टीझर या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो की या मुली आता फक्त परिणाम भोगणाऱ्या राहणार नाहीत, तर त्याला उत्तरही देतील. द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्ड यावेळी केवळ वेदना आणि यातनांची कथा राहात नाही. यावेळी या महिला परिस्थितीच्या मूक बळी ठरत नाहीत. फसवणुकीचे परिणाम गप्प बसून सहन करण्याऐवजी त्या उभ्या राहतात, आवाज उठवतात आणि पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देतात.

त्यानंतर येणारा हा सिक्वेल आणखी पुढे जाण्याचं आश्वासन देतो. कम्फर्टच्या पलीकडे, शांततेच्या पलीकडे आणि नकाराच्या पलीकडे. कमाख्या नारायण सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या द केरला स्टोरी 2: गोज़ बियॉन्डचे निर्माते विपुल अमृतलाल शाह असून, सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली आशीष ए. शाह हे सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

द केरळ स्टोरी २ चा टीझर पहिल्या भागापेक्षा अधिक गंभीर आणि धक्कादायक
• महिलांच्या संघर्षातून उभा राहणारा प्रतिकार आणि सत्याचा शोध
• कमाख्या नारायण सिंग दिग्दर्शित, विपुल अमृतलाल शाह निर्माते
• चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा