मनोरंजन

मोठ्याचा मुलगा असो किंवा कोणत्या नेत्याचा सर्वांसाठी कायदा समानच – अजित पवार

Published by : Lokshahi News

मुंबई-गोवा-मुंबई क्रुझवर मोठी धाड टाकत एनसीबीने बऱ्याच जणांना ताब्यात घेतले. यामध्ये सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही सहभाग होता. आर्यनसोबत ८ जणांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. एनसीबी अधिकारी आर्यनला काल मुंबईच्या जे जे रुग्णालयात मेडिकलसाठी घेऊन गेले होते. तिथे त्याची वैद्यकीय तपासणी केली. विशेष म्हणजे आर्यनने स्वत: आपल्या लेन्सच्या डब्ब्यातून ड्रग्ज नेल्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यानंतर त्यांची चौकशी करून अटक केली आहे. तसेच, त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह तिघा जणांना एका दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली आहे. यामध्ये 12 जणांना अटक कऱण्यात आली आहे. दरम्यान, आर्यन खानवर या प्रकरणात गुन्हा दाखल होणार की नाही ही चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. मुलगा कुणाचाही असो, कायदा सर्वांना समान आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.

दरम्यान, आर्यनवरील कारवाईनंतर रविवारी रात्री उशीरा अभिनेता सलमान खान हा शाहरूखची भेट घेण्यासाठी त्याच्या 'मन्नत' बंगल्यावर पोहोचला होता. सलमानची गाडी पाहिल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला, मात्र सलमान कोणतीही प्रतिक्रिया न देता थेट आतमध्ये गेल्याचे एका वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे. आर्यनकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 पील्स व रोख 1.33 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. त्यामुळे त्याच्यावर बरेच आरोप करत अटक करण्यात आली आहे. आज आर्यनच्या जामिनासाठी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा