मनोरंजन

'कन्नी' चित्रपटाच्या नवीन पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

'कन्नी' या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

'कन्नी' या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मागच्या वेळी बिग बेनला मिठी मारलेले पोस्टर झळकले होते. या पोस्टरने उत्कंठा वाढवलेली असतानाच आता या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. सायकलवर बसलेली हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यात दिसत आहेत. मात्र यात अजिंक्य राऊत मिसिंग असल्यामुळे हे पोस्टर बघून पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच वाढली असणार.

पोस्टरमधील चौघांचेही आनंदी चेहरे त्यांच्यातील घट्ट मैत्री दर्शवत आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नांकडे झेप घेणारी ही 'कन्नी' ८ मार्चलाला प्रेक्षकांशी बांधली जाणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे लेखन समीर जोशी यांचे असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी 'कन्नी'चे निर्माते आहेत.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, '' ज्याप्रमाणे 'कन्नी' जशी पतंगाला बांधून ठेवते तशीच ही कन्नी सुद्धा मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी आहे. सर्व वयोगटाला आवडेल असा हा चित्रपट आहे. या चित्रपटात धमाल आहे, इमोशन्स आहेत. हे सगळे पाहाण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.''

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा