सलमान खानचा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट 'सिकंदर' चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटांची घोषणा झाल्यापासून चाहते प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुरुगादोस यांनी केले आहे. टीझरमध्ये सलमान खानचा लुक समोर आला आहे.
चित्रपटाचा प्रदर्शित झालेला टीझर 1 मिनिट 21 सेकंदांचा आहे. सुरुवातीला सलमान खानच्या 'सिकंदर'च्या भूमिकेत धमाकेदार एंट्रीने होते. टीझरमध्ये सलमान खानाचा पहिला संवाद ऐकल्यावर आपल्याला समजते की त्याला सिकंदर हे नाव कसे पडले. त्याच्या आजीने त्याचे नाव 'सिकंदर' ठेवले, तर आजोबांनी त्याचे नाव संजय ठेवले. त्यानंतर टीझरमध्ये अॅक्शन सीन्स दाखवण्यात आले आहेत. जिथे 'सिकंदर' एकटा सर्व शत्रूंना हरवताना दिसत असतो.