मनोरंजन

'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात; अक्षय कुमारने केलं पोस्ट

Published by : Siddhi Naringrekar

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातील अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘हर हर महादेव’, ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटानंतर अजून एक दिग्दर्शक महेश मांजेरकर यांचा आगामी चित्रपट ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेता अक्षय कुमार याने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. अक्षयने लिहिले की, 'वेदात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरुवात होत आहे, ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे.त्यांच्या जीवनातून आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने प्रेरणा घेण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन! आशीर्वाद देत राहा अशा शब्दातली त्याने पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या चित्रिकरणाला आजपासून सुरवात झाल्याची माहिती दिली आहे.

 २ नोव्हेंबर रोजी वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाचा शुभारंभ प्रयोग पार पडला होता. या कार्यक्रमाला मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थिती होती. हा चित्रपट २०२३मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील अक्षय कुमारच्या फर्स्ट लूकची झलक यावेळी दाखवण्यात आली. शिवकाळातील एक पराक्रमी पान उलगडण्यासाठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पाऊल पुढे टाकलं आहे. शिवकाळातील सात वीरांचे महत्त्व सिनेमातून मांडण्यात येणार आहे.

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान

IPL 2024 : आरसीबी आणि मुंबई इंडियन्सला अजूनही प्ले ऑफमध्ये खेळण्याची संधी, 'असं' आहे समीकरण

"नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला, तर..."; संजय राऊतांनी दिला इशारा

नाशिकमध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अखेर नाशिकचा तिढा सुटला; शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर