Drishyam 2  Team Lokshahi
मनोरंजन

‘दृश्यम 2’ या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात;फोटो आले समोर

Published by : Saurabh Gondhali

अजय देवगन यांच्या दृश्यम 2 या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. याआधीचा दृश्यम हा सिनेमा बॉक्सऑफिसवर सुपरहीट ठरला होता. खरं तर हा सिनेमा दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक होता. तरीसुद्धा चाहत्यांनी याला डोक्यावर घेतले. दक्षिणेमध्ये दृश्यम 2 हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचा हिंदी रिमेक कधी येतोय याची चाहते आवर्जून वाट पाहत होते. नुकतेच अभिनेत्री तब्बू हिने या संदर्भाची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली.

या फोटोला शेअर करत तब्बून लिहिलं आहे,''पहिला दिवस,दृश्यम २''. सूत्रांच्या माहितीनुसार कळतंय की,तब्बून या सिनेमाचं शूटिंग गोव्यात सुरु केलं आहे. या सिनेमात तिच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. याबरोबच श्रीया सरन,इशिता दत्त या सिनेमात तिच्यासोबत दिसणार आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगण विजय साळगावकर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तब्बू देखील पोलिस अधिकारी साकारणार आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 'दृश्यम २' हा १९ फेब्रुवारी,२०२१ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या मल्याळम सिनेमाचा हिंदी रीमेक असणार आहे. मल्याळम सिनेमा 'दृश्यम २' मध्ये साऊथ सुपर स्टार मोहन लाल यानं मुख्य भूमिका केली होती. या सिनेमातील भूमिकेसाठी मोहन लाल याचं खूप कौतूकही करण्यात आलं होतं.

तब्बूचा 'भूलभूलैय्या २' सिनेमाचा ट्रेलरही नुकताच रीलीज करण्यात आला आहे. बोललं जात आहे की तब्बू 'भूलभूलैय्या २' मध्ये अमिषा पटेलनं पहिल्या भागात केलेली व्यक्तिरेखा साकारत आहे. अनीस बझ्मी दिग्दर्शित या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारिख अनेकदा पुढे ढकलली गेली होती. सुरुवातीला हा सिनेमा २५ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता,परंतु आता २० मे ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा