प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो पुणे पोलिसांनी स्टेजवर चढून बंद पाडल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील राजाबहाद्दूर मिल परिसरात रविवारी रात्री प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांचा शो होता.
रात्रीचे 10 वाजल्यानंतरही कार्यक्रम सुरूच ठेवल्याने पोलिसांनी रहमान यांना चांगलेच खडेबोल सुनावले. पुणे पोलिसांनी स्टेजवर जाऊन हा कार्यक्रम बंद पाडला. पुणे पोलीस निरीक्षकांनी स्टेजवर जाऊन रहमान यांचा शो बंद पाडला. 10 वाजल्यानंतरही ए आर रहमान यांचे गाणे सुरूच होते. त्यामुळे पोलीस निरीक्षकाला हा शो बंद पाडावा लागला.
रात्री 10 वाजल्यानंतरही तुम्ही शो सुरूच कसा ठेवू शकता? रात्री 10 नंतर कार्यक्रम करण्यास कोर्टाने मनाई केलेली आहे हे तुम्हाला माहीत नाही काय? असे म्हणत पुणे पोलिसांनी ए आर रहमान यांना खडेबोल सुनावले.