मनोरंजन

Oscar 2022 | ‘थप्पड’ चा झाला चांगला परिणाम; शो ची सर्व तिकिटे विकली गेली…

Published by : Team Lokshahi

यंदाच्या ऑस्कर (Oscar) वितरण सोहळ्यामध्ये एक अनपेक्षित घटना घडली. या घटनेमध्ये अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याने सूत्रसंचालन करत असलेल्या ख्रिस रॉक (Chris Rock) याच्या कानशिलात लगावली या सर्व प्रकाराने उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले होते.

या घटनेनंतर क्रिस रॉक याच्या स्टँड अप कॉमेडी शो (Stand up comedy show) ची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.TickPick या तिकीट विक्री करणाऱ्या कंपनी असे सांगितले, आम्ही मागच्या महिन्यात एवढे तिकीटविक्री झाली नाहीत तेवढी एका रात्रीतून तिकिटे विक्री झाली.

कंपनीच्या म्हणण्यानुसार रविवार पर्यंत या तिकिटांचा दर साधारणपणे 46 USD एवढा होता तो वाढून 341 USD एवढी त्यामध्ये वाढ झाली. ख्रिस रॉक बुधवारच्या दिवशी एका पाठोमाग एक शो करणार आहे.

यंदाच्या ऑस्कर सोहळ्या मध्ये ख्रिस रॉक याने सूत्रसंचालन करताना अभिनेता विल स्मिथ याच्या बायकोवर टिपणी केली होती. याचा स्मिथ याला राग येऊन त्याने स्टेजवर जाऊन रॉक च्या कानशिलात लगावली.

या घटनेच्या काही वेळानंतर विल स्मिथ याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार (Oscar Award) जाहीर झाला. यावेळी त्याच्या भाषणामध्ये व नंतर इंस्टाग्राम (Instagram) वर त्याने झालेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा