मनोरंजन

बहुचर्चित "हवाहवाई" चित्रपटातलं गाणं प्रदर्शित

'तू न झुकणारी, तू गं लढणारी, नारी तू लई लई भारी' असे दमदार शब्द असलेलं 'तू जा गं पुढं मर्दानी' हे बहुचर्चित 'हवाहवाई' चित्रपटातलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

Published by : Siddhi Naringrekar

'तू न झुकणारी, तू गं लढणारी, नारी तू लई लई भारी' असे दमदार शब्द असलेलं 'तू जा गं पुढं मर्दानी' हे बहुचर्चित 'हवाहवाई' चित्रपटातलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं. गायिका उर्मिला धनगरच्या आवाजातलं हे गाणं प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. हवाहवाई हा चित्रपट ७ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

मराठी तारका प्रॉडक्शन्सचे महेश टिळेकर आणि नाईनटिन नाईन प्रॉडक्शन्सचे विजय शिंदे यांनी "हवाहवाई" चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर महेश टिळेकर यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि संकलन केलं आहे. मल्याळम चित्रपटांतील अभिनेत्री निमिषा संजयन हवाहवाईद्वारे मराठीत पदार्पण करत आहे. तिच्यासह वर्षा उसगावकर, संजीवनी जाधव, किशोरी गोडबोले, समीर चौघुले, अतुल तोडणकर, सिद्धार्थ जाधव, गौरव मोरे, मोहन जोशी, स्मिता जयकर, गार्गी फुले, प्राजक्ता हनमघर, पूजा नायक, सीमा घोगळे, बिपिन सुर्वे, अंकित मोहन असे उत्तम कलाकार या चित्रपटात आहेत.

महेश टिळेकर यांनीच लिहिलेलं हे गाणं पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. आतापर्यंत उत्तमोत्तम आणि हिट गाणी गायलेल्या उर्मिला धनगरनं हे गाणं गायलं आहे. या गाण्याविषयी लेखक, गीतकार दिग्दर्शक महेश टिळेकर म्हणाले, गायिका उर्मिला धनगरनं तिच्या आवाजाद्वारे या गाण्याचं सोनं केलं आहे. अतिशय दमदार असलेलं हे गाणं प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा