मनोरंजन

Mahavatar Narsimha Movie : 'महावतार नरसिंह'च्या रिलिजनंतर 'सैय्यारा'ची जादू फिकी; दुसऱ्या दिवशी केला 5 लाखांचा टप्पा पार

नुकताच 25 जुलै 2025 रोजी रिलिज झालेला दक्षिणात्य चित्रपट 'महावतार नरसिंह' याने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे.

Published by : Prachi Nate

नुकताच 25 जुलै 2025 रोजी रिलिज झालेला दक्षिणात्य चित्रपट 'महावतार नरसिंह' याने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन कुमार यांनी केलं आहे. तर 'महावतार नरसिंह' हा एक 3D अॅनिमेशन आणि पौराणिक कथांचे एक सुंदर मिश्रण आहे. या चित्रपटाने रिलिज होताच पहिल्या दिवशी जगभरात 2.29 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी सुमारे 5.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

यादरम्यान सैयाराने दोन दिवसांनंतर एकूण देशांतर्गत, बॉक्स ऑफिस कलेक्शनवर 45 कोटी रुपये कमवले आहेत. तर 'महावतार नरसिंह' हा चित्रपट क्लीम प्रॉडक्शनने होम्बाले फिल्म्सच्या सहकार्याने अनेक भाषांमध्ये तयार करून पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर हिंदी भाषेमध्ये हा चित्रपट आघाडीवर आहे.

या चित्रपटात भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हाद यांची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली आहे. ज्यात भक्त प्रल्हादाचे वडील हिरण्यकशिपू हा भक्त प्रल्हादाचा अथक छळ करतो असतो, अखेर तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी भगवान विष्णू आपला एक अवतार धारण करतात. ज्यामुळे भक्त प्रल्हादाला आणि संपुर्ण ब्रह्मांडाला हिरण्यकशिपूच्या अत्याचारापासून सुटका मिळते.

अशाप्रकारचा धार्मिकता आणि अहंकार, श्रद्धा आणि हुकूमशाही यांच्यात नाट्यमय संघर्ष या चित्रपटात पाहायला मिळतो. या चित्रपटाच्या पात्रांसाठी आदित्य राज शर्मा, हरिप्रिया मट्टा, संकेत जायसवाल, प्रियंका भंडारी, वसुंधरा बोस, हरजीत वालिया, संचित वर्तक, सांवरी याज्ञिक आणि दिनेश यांनी आपापले आवाज दिले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा