मनोरंजन

आता INOX मध्ये बघता येणार T-20 विश्वचषक स्पर्धा

Published by : Lokshahi News

17 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या T-20 विश्वचषक स्पर्धेचा रोमांच आता मल्टिप्लेक्स चेन असलेल्या आयनॉक्समध्ये अनुभवता येणार आहे . त्यामुळे क्रिकेटप्रेमींना टीम इंडियाच्या सर्व सामन्यांचा आनंद मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे. या वर्षी यूएई आणि ओमनमध्ये आयसीसी T-20 विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार असून बीसीसीआय या स्पर्धेचे आयोजन करणार आहे.

याबाबत आयनॉक्सने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये असे सांगण्यात आले आहे की, टीम इंडियाचे सर्व सामने आयनॉक्सच्या थिएटर्समध्ये दाखवण्यात येणार आहेत. भारतातील क्रिकेटचे वेड लक्षात घेता आयनॉक्सने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर क्रिकेटचे सामने पाहता येणार आहेत. तसेच या दरम्यान थिएटर्समध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांचाही अनुभव घेता येणार आहे. या दरम्यान कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करण्याचा निर्णय आयनॉक्सने घेतला आहे. या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये सामने पाहण्यासाठी वेगवेगळ्या शहरात वेगवेगळे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत. मेट्रो शहरात हा तिकीट दर 500 रुपये तर इतर शहरात तो 200 रुपये एवढा असेल.

दकम्यान 24 ऑक्टोबर रोजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात टीम इंडिया T-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. पाकिस्तान आणि भारताचे क्रिकेट संघ जवळपास दोन वर्षानंतर आमने- सामने येणार आहेत. त्यानंतर भारत 31 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये न्यूझीलंडच्या विरोधात सामना खेळेल. त्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी अबूधाबीमध्ये टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तान विरोधात असेल.

मारुतीला पानांचा हार अर्पण करण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या...

Nana Patole On PM Modi: नरेंद्र मोदींचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा नाना पटोले यांनी लावला घणाघाती आरोप

Daily Horoscope 08 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना मेहनतीचं आवक फळ मिळणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 08 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Rupali Chakankar: EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल