Shamshera  Team Lokshahi
मनोरंजन

Shamshera : 'शमशेरा' चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

'शमशेरा' या चित्रपटामध्ये रणबीर साकारणार डबल रोल

Published by : shamal ghanekar

'शमशेरा' (Shamshera) चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असताना चित्रपटाचा ट्रेलर 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामधील संजय दत्तचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे. 'शमशेरा' या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor), अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे प्रमुख भुमिकेत असणार आहेत. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

वाणी कपूरने या चित्रपटामधील संजय दत्तचा लूक शेअर केला आहे. वाणीनं संजयचा हा लूक शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'निर्दयी' या शब्दाचा दुसरा अर्थ पोलीस शुद्ध सिंह आहे.' संजय हा शुद्ध सिंह या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. वाणी ही एका डान्सरची भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटामधील भूमिकेसाठी वाणीने कथ्थक नृत्याचे ट्रेनिंग घेतले. रणबीर हा डबल रोल साकारताना दिसणार आहे.

संजय दत्तने एका मुलाखतीमध्ये त्याच्या या चित्रपटामधील भूमिकेबाबत सांगितलं की, 'शुद्ध सिंग हे पात्र मी साकारत आहे. याआधी हे पात्र तुम्ही पडद्यावर पाहिले नसेल. तो फक्त खलनायक आहे. असे संजय दत्त म्हणाला. तसेच पुढे संजय दत्त म्हणाला की, मी भूमिका साकारावी असे करण मल्होत्राला वाटले. त्यांनी मला शुद्ध सिंहला साकारण्याची संधी दिली आहे. आणि मला आशा आहे की लोकांना माझी ही भुमिका आवडेल.

'शमशेरा' हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आदित्य चोप्राने 'शमशेरा' चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'शमशेरा' हा चित्रपट 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी