Sunny Deol Team Lokshahi
मनोरंजन

Sunny Deol : डिंपल आणि सनीबद्दल सत्य आलं समोर....

डिंपल कपाडियाने केला सनी देओलवर मन दुखावण्याचा आरोप....

Published by : prashantpawar1

सनी देओल (Sunny Deol) हे नाव त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडले गेलेले आहे. यामध्ये अमृता सिंगपासून ते डिंपल कपाडियापर्यंतच्या नावांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार अमृता सिंह (Amrata Sinha) आणि सनी देओल ही जोडी 'बेताब' चित्रपटात एकत्र दिसली होती. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्या प्रेमाला बहर आल्याचे बोलले जात होतं. मात्र सनी देओल आधीच विवाहित होता आणि जेव्हा अमृताला ही गोष्ट कळली तेव्हा तिने सांगितले की सनी देओलने मन दुखावल्याचा आरोप केला. मात्र सनीचे लग्न झाल्याचे समजताच अमृताने त्याच्यापासून दुर राहण्याचा निर्णय घेतला. अमृतापासून वेगळे झाल्यानंतर सनी देओलचे नाव अभिनेत्री डिंपलसोबत जोडले गेले. बातमीनुसार डिंपल आणि सनी देओलमध्ये आजही खूप खास बॉन्डिंग आहे. दोघांनी 'नरसिंहा', 'गुनाह', 'अर्जुन', 'मंझिल-मंझिल' आणि 'आग का गोल' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले आहे.

काही चित्रपटांमध्ये एकत्र काम करत असताना डिंपल आणि सनी या दोघांमधली जवळीक वाढली होती असं म्हटलं जात होतं. इंडस्ट्रीमध्येही डिंपल आणि सनीच्या बाँडिंगची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. आपापल्या कुटुंबांना ब्रेकअप होण्यापासून वाचवण्यासाठी दोघांनी लग्न केलं नसल्याचं बोललं जातंय. डिंपलचे लग्न राजेश खन्नासोबत तर सनी देओलचे लग्न पूजासोबत झाले होते.

जेव्हा सनी देओलची पत्नी पूजा हिला सनी आणि डिंपलच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने तिच्या पतीला स्पष्ट सूचना दिल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार पूजाने सनीला सांगितले होते की जर तिने डिंपलला सोडले नाही तर मी मुलांसह त्याच्यापासून कायमची दूर जाईल अशी देखील धमकी दिली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा