Karan Johar Team Lokshahi
मनोरंजन

Karan Johar : करणने उघड केलं सारा अन् कार्तिकबद्दलचं सत्य...

करणने सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यातील नात्याचा खुलासा केला आहे.

Published by : prashantpawar1

करण जोहर (Karan Johar) आपल्या लोकप्रिय चॅट शो कॉफी विथ करणचा सातवा सीझन घेऊन परतला आहे. या शोचा पहिला एपिसोड प्रसारित झाला आहे. ज्यामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) यांची जोडी दिसली होती. करण जोहरचा हा शो वादामुळे चर्चित राहिला आहे. पण एक मात्र सत्य आहे की अनेक सेलिब्रिटींनी करण जोहरसमोर सोफ्यावर बसून त्यांच्या क्रश किंवा रिलेशनशिपचा इशाराही दिला आहे. याच शोच्या एका एपिसोडमध्ये आलियाने कबूल केले की तिला रणबीर कपूर आवडतो. कतरिना कैफनेही करणसमोर म्हटले होते की तिची जोडी विकी कौशलसोबत चांगली दिसेल

आजच्या काळात हे दोन्ही जोडपे त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. त्याचवेळी आता करण जोहरनेही सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्यातील नात्याचा खुलासा केला आहे. पुढे करण जोहरने सारा अली खानबद्दल बोलताना सांगितले की 'साराने या शोमध्ये कार्तिकचे नाव घेतले आणि त्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. शोच्या काही सीझनमध्ये आलियाने रणबीरचे नावही घेतले आहे आणि दोघेही विवाहित आहेत.

दोघेही लवकरच आई-वडील होणार आहेत. या सोफ्याने अनेक नातेसंबंध सुरू केले हे अगदी छानच म्हणावे लागेल. आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की ज्यावेळी सारा अली खान 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये दिसली तेव्हा अभिनेत्रीने सांगितले की तिला कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे. ही गोष्ट 2018 सालची असून त्यानंतर 2020 मध्ये 'लव्ह आज कल' या चित्रपटात दोघेही दिसले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा