मनोरंजन

हंसिका आपल्या पार्टनर सोहेल च्या पहिल्या लग्नात डान्स करतानाचा व्हिडिओ होतोय जबरदस्त वायरल...

सोहेल च्या पहिल्या लग्नाची माहिती समोर आली, रिंकी बजाज सोबत २०१६ मध्ये सोहेल चे पहिले लग्न गोवा मध्ये झाल्याचे काही फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मिडीयावर वायरल होताना दिसून येतायत, त्यात स्वतः हंसिका डान्स करताना दिसत आहे

Published by : Team Lokshahi

सध्या सोशल मिडीयावर जबरदस्त चर्चेत असलेली जोडी म्हणजेच 'हंसिका' आणि 'सोहेल' लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याचे समोर आले. पॅरिस मधील आयफेल टॉवरसमोरील काही खास फोटोज शेअर करून हंसिका ने आपल्या चाहत्यांना आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याचदरम्यान आता सोहेल च्या पहिल्या लग्नाची माहिती समोर आली, रिंकी बजाज सोबत २०१६ मध्ये सोहेल चे पहिले लग्न गोवा मध्ये झाल्याचे काही फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मिडीयावर वायरल होताना दिसून येतायत, त्यात स्वतः हंसिका डान्स करताना दिसत आहे.त्यांनंतर काही कारणास्तव सोहेल आणि रिंकी ने वेगळे होण्याच्या निर्णय घेतला.

हंसिकाच्या चाह्त्यांमध्ये हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. पण हंसिका आणि सोहेलने 4 डीसेंबरला जयपूर मधील एका किल्ल्यावर रॉयल डेस्टीनेशन वेडिंग करण्याचे ठरवले आहे. २ डीसेंबर पासून लग्नाचे विधी सुरु होतील.आणि लग्नात फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराची उपस्थिती असेल. हंसिका आणि सोहेलचे कुटुंबीय सध्या लग्नाची जोरदार तयारी करताना दिसतायत.

हंसिका आणि सोहेल फक्त लाईफ पार्टनर्सच नसून बिसीनेस पार्टनर्स सुद्धा आहेत. त्या दोघांची एक इवेंन्ट मॅनेजमेंट कंपनी आहे. लवकरच दोघे लग्न बंधनात अडकून आपल्या चाहत्यांना खुशखबर देतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ