मनोरंजन

Sidharth Shukla| सुशांत सिंह राजपूत आणि सिद्धार्थच्या मृत्यूमध्ये ‘हे’ आहे साम्य

Published by : Lokshahi News

अभिनेता आणि 'बिग बॉस 13'चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता आणि त्याला यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. अशा स्थितीत सिद्धार्थच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) अशा अचानक मृत्यूने संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं आहे. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कला क्षेत्रामध्ये तत्पूर्वी सोशल मीडियावर एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. सिद्धार्थच्या मृत्यूला चाहते सुशांत सिंग राजपूतच्या(Sushant Singh Rajput) मृत्यूसोबत जोडत आहेत.

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्याच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. सिद्धार्थचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सध्या चाहते शेयर करत आहेत. त्याचंप्रमाणे कूपर रुग्णालय सिद्धार्थच्या घरापासून जवळच्या अंतरावर असलेलं रुग्णालय आहे. तसेच ते एक प्रचलित रुग्णालय आहे त्यामुळे अभिनेत्याला या रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. दरम्यान सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत एक आश्चर्यकारक चर्चा सुरु झाली आहे.

काही युजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे, 'सिद्धार्थची बॉडी कूपर रुग्णालयातचं का ठेवण्यात आली आहे. जेव्हा की सुशांतची बॉडीसुद्धा कूपरमध्येचं ठेवण्यात आली होती. इथं काहीतरी गूढ नक्कीचं आहे. आणि हा हृदयविकार नव्हे तर सुशांतसारखा मर्डरचं आहे. अशी धक्कादायक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा