FiFa World Cup 2022 Team Lokshahi
मनोरंजन

फिफा वर्ल्ड कपमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी

फिफा विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात जबरदस्त सामना झाला. अर्जेंटिना संघाने फिफा ट्रॉफी जिंकली आहे.

Published by : shamal ghanekar

फिफा विश्वचषक 2022 मध्ये फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात जबरदस्त सामना झाला. अर्जेंटिना संघाने फिफा ट्रॉफी जिंकली आहे. पेनल्टी शूटआऊटमध्ये रोमहर्षक लढतीत फ्रान्सचा पराभव करून लिओनेल मेस्सीच्या संघाने विक्रम केला आहे. फिफा वर्ल्ड कप 2022च्या अंतिम सामन्यामध्ये अनेक फुटबॉल चाहते उपस्थित होते. फुटबॉल विश्वचषकाचा अंतिम सामन्यामध्ये अभिनेत्री रविना टंडनताही उपस्थित होती. रविनाने तिच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रविनाने शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत.

फिफा विश्वचषक 2022चा सामना पाहण्यासाठी रविना तिच्या मुलासोबत कतारला गेली होती. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रविना लहान मुलगा रणबीर थडानीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. रविनाने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सही केल्या आहेत. तर एक चाहत्याने खूप छान बॉन्डिंग आहे. अशी कमेंट्स केली आहे. तसेच नोराने जबरदस्त परफॉर्मन्स दिला असून या परफॉर्मन्सने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. या कार्यक्रमात नोरा काळ्या रंगाच्या चमकदार आउटफिटमध्ये डान्स करताना दिसली.

फिफा विश्वचषक 2022मध्ये रविना टंडनशिवाय नोरा फतेही, करिश्मा कपूर, कार्तिक आर्यन, चंकी पांडे, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांनी देखील हजेरी लावली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा