मनोरंजन

मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकरांच्या मुलीच्या लग्नात 'या' बॉलिवूड कलाकारांची लावली हजेरी

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सलमान खान, रणवीर सिंग आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं हजेरी लावली आहे.

Published by : shweta walge

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शन पार्टीत सलमान खान, रणवीर सिंग आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं हजेरी लावली आहे. या दरम्यान, रणवीरनं तर परफॉर्म केलं. विवेक फणसळकर यांच्या मुलीच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. 

या कार्यक्रमात सलमान, रणवीर आणि शिल्पा स्टायलिश लूकमध्ये दिसले. सलमान खानचा एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये तो स्टेजवर वधू-वरांचे अभिनंदन करताना दिसत आहे. यादरम्यान सलमानने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये तो खूपच हॅंडसम दिसत होता. फोटोमध्ये मैत्रेयीनं सलमान खानचा हात पकडला होता. सोबतच रणवीर सिंगही डॅपर लूकमध्ये दिसला. रणवीरनं यावेळी गुलाबी रंगाची पँट आणि फ्लोरल ब्लेझरसह निळा शर्ट, तपकिरी रंगाची टोपी परिधान केली होती. शिल्पा शेट्टीनं लाल रंगाची साडी परिधान केली होती. मुंबईत महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांविरोधात महामोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चा आणि आंदोलनात कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांकडे होती. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या लेकीचं लग्न असतानाही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले.

सध्या सलमान हा एक रिअॅलिटी शो होस्ट करत आहे. याशिवाय 'किसी का भाई किसी की जान' आणि 'टायगर 3' त्याचे हे दोन चित्रपटही येणार आहेत. सलमानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात त्याच्यासोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा